डिजीटल डावपेच -निवडणूक प्रचारातील नवा खेळाडू : AI

(0) 0 Reviews 7 Orders 1 Wish listed

₹290.00 ₹360.00

Quantity :
Total price :
  (Tax : )

"डिजिटल डावपेच – निवडणुकीतील नवे खेळाडू आणि त्यांच्या विजयाचे रहस्य उलगडणारे पुस्तक."

"तुम्ही मतदान का करता?"

हा प्रश्न जितका साधा वाटतो, तितकाच खोल आहे.

बहुतेकजण म्हणतील देशासाठी, विकासासाठी, नेत्याला

निवडण्यासाठी; पण आपण खऱ्या अर्थानं का मतदान करतो, त्याहून

महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोणत्या आधारावर मतदान करतो ? पूर्वी

मतदानाचा निर्णय मुख्यतः समाजातले मुद्दे, उमेदवाराचा स्वभाव,

पक्षाचं धोरण आणि कुटुंबाची राजकीय परंपरा यावर आधारित

असायचा. प्रचार म्हणजे रस्त्यांवरचे पोस्टर्स, गल्लीबोळातले जाहीर

सभांचे ढोल, आणि घरोघरी येणारे कार्यकर्ते; पण आता.... ?

आज तुम्हाला एखादा राजकीय संदेश व्हाट्सअप वर येतो,

फेसबुक वर एखादा व्हिडीओ दिसतो आणि क्षणात तुमच्या मनात

त्या नेत्याबद्दल मत तयार होतं. तो मेसेज कोणी पाठवला? कशाच्या

आधारावर पाठवला? तुम्ही का निवडले गेलात हेच माहीत नसतं

आणि नेमकं तिथेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) नावाची अदृश्य शक्ती

काम करत असते.

A आता तुमचा विचार, आवड असंतोष आणि भीती यांचा

अभ्यास करते आणि त्यानुसार तुमच्यासाठी 'योग्य' संदेश तयार

करते. ही 'योग्यता' फार सूक्ष्म आणि विचारपूर्वक ठरवलेली असते.

आणि आपण नकळत त्यात ओढले जातो.


हे पुस्तक अशाच अनेक प्रश्नांची आणि प्रक्रियांची उकल

करण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक तांत्रिक माहिती देण्यापुरतं मर्यादित

नाही तर वाचकाच्या सजगतेला आवाहन करणारं आहे. कारण

एक मतदार म्हणून आपल्याला जेवढा अधिकार आहे, तेवढीच

जबाबदारीही आहे. आपल्या मतावर एखाद्याचा सत्तेत प्रवेश ठरतो

आणि म्हणून त्या निर्णयामागे कोणते अनामिक हात काम करत

आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे.

कदाचित हे पुस्तक वाचून तुम्ही तुमचं राजकीय मत

बदलणार नाही; पण एक गोष्ट नक्की होईल तुम्ही निर्णय अधिक

सजगपणे घ्याल आणि लोकशाहीसाठी हीच खरी विजयाची पायरी

असते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करू या. एका अदृश्य

प्रचारयंत्रणेच्या शोधात जिचं नाव आहे "AI", आणि जिचा प्रभाव

आहे "तुमच्या माझ्या मतांवर, आगामी निवडणुकांवर आणि आपल्या

लोकशाहीवर".


म्हणून नक्की वाचा 

डिजिटल डावपेच 

निवडणूक प्रचारातील नवा खेळाडू :AI

लेखक : महेश शरद राऊत 
वेबसाइट : https://digitaldavpech.com



No review given yet!

Fast Delivery all across the country
Safe Payment
7 Days Return Policy
100% Authentic Products

More from the store

-₹200.00

चप्पल

₹999.00 ₹799.00

-₹200.00

चप्पल

₹999.00 ₹799.00

-₹200.00

चप्पल

₹999.00 ₹799.00

-₹200.00

चप्पल

₹999.00 ₹799.00

-₹200.00

चप्पल

₹999.00 ₹799.00

डिजीटल डावपेच -निवडणूक प्रचारातील नवा खेळाडू : AI
₹290.00₹360.00 ₹0.00
₹290.00₹360.00